वितरक, फ्रँचायझी, जॉब-वर्क की संयुक्त उपक्रम (Joint Venture)? कोणासोबत, कोणत्या अटींवर, आणि उद्या बिनसलं तर बाहेर कसं पडायचं — सगळं आकड्यांसह, सोप्या मराठीत.

वितरक असो, शेजारचा कारखाना असो, मोठा ग्राहक असो की फ्रँचायझी — पुस्तकाचं प्रत्येक प्रकरण याच चार प्रश्नांभोवती फिरतं.
मी नेमकं काय देतो? नफ्यातला वाटा, ग्राहकाचं नातं, ज्ञान, वेळ — जे बिलात कुठेच दिसत नाही, तेही.
मला खरंच काय मिळतं? "मोठं नेटवर्क" नव्हे — किती किलो, किती रुपये, कधीपर्यंत, लेखी.
कधीच काय सोडायचं नाही? ब्रँड, ग्राहकांची माहिती, पाककृती किंवा रेखाचित्र, आणि अंतिम निर्णय.
उद्या बिनसलं, तर बाहेर कसं पडायचं? सूचना, माल, पैसे, साचे — हे आत्ताच, मैत्री असतानाच ठरवा.
सहयोगाची शिडी: प्रत्येक पायरीवर बांधिलकी वाढते. पुस्तकाचा नियम एकच — पुराव्याशिवाय दोन पायऱ्या एकदम चढायच्या नाहीत.
पुस्तकात सायली (नवा मसाल्यांचा व्यवसाय) आणि महेश (औद्योगिक सुटे भाग बनवणारा कारखाना) यांच्या भागीदाऱ्या वर्षभर, आकड्यांसह पुढे जातात. ही दोन्ही पात्रं काल्पनिक आहेत — पण त्यांचं गणित तुमच्या धंद्याचंच आहे.
प्रत्येक किलोमागे ₹५२ कमी. महिन्याला ६० किलो म्हणजे दरमहा सुमारे ₹३,१२० — आणि पुण्याचे सगळे दरवाजे दोन वर्षं बंद. पुढे ती कोणत्या अटी बदलते, ते प्रकरण १ ते ५ मध्ये.
जवळजवळ तीनपट कमी भांडवल. पण त्याच वेळी एका ग्राहकाचा वाटा २४% वरून ४३% वर गेला — ही किंमत तो कशी मोजतो आणि कशी सांभाळतो, ते पुढच्या प्रकरणांत.
स्वतःचा ₹४०,००० पगार धरला, की परतफेड सव्वातीन वर्षं — आणि करार पाच वर्षांचा. त्याचं वाक्य: "मी व्यवसाय नाही, पंचवीस लाखांची नोकरी विकत घेत होतो."
पात्रं आणि आकडे शैक्षणिक उदाहरणं आहेत; तुमच्या धंद्यात तेच गणित तुमच्या आकड्यांवर कसं मांडायचं, ते प्रत्येक प्रकरणातल्या कृतीपत्रिकेत.
वकिलाकडे जाण्याआधी काय ठरवायचं, ते मुद्देसूद — रिकाम्या जागा भरून वापरायचे साचे.
हे कायदेशीर मसुदे नाहीत; प्रत्यक्ष करार वकिलाकडून तपासून घ्या.
हे अभिप्राय बिझनेस सारथीच्या इतर पुस्तकांबद्दल आणि प्रशिक्षणाबद्दल आहेत; खंड ३ नुकताच प्रकाशित झाला आहे.
मी जवळपास १५ वर्षे व्यवसायात आहे, पण माझ्या व्यवसायाचे vision, mission, purpose काय आहे, हे आतापर्यंत स्पष्ट झालेच नव्हते — यावेळी ते स्पष्ट झाले… आम्ही काही AMC पॅकेज डिझाईन केले, आणि आम्हाला २ ठिकाणी AMC साठी निवडले गेले.
'एक नंबर जिद्द जिंकण्याची' मी वाचलंय सर. सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणाला भेदून त्यात नवचैतन्य, आत्मविश्वास जागृत करण्याचा हा प्रयत्न खरोखरच अद्वितीय, अकल्पनीय आहे.
I am not that book reading person, but your book is not making me bore while reading… मी रोज रात्री मुलासोबत वाचते, त्याला पण खूप आवडलं आहे.
आज ₹१४९ भरा. उद्या कोणताही प्रस्ताव आला, तर तुमच्याकडे चार प्रश्न, ९६ तपासण्या आणि पाच नमुना-कागदपत्रं तयार असतील.
माझा खंड ३ ₹१४९ ला मिळवा →सणासुदीची ऑफर १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत · पहिलं प्रकरण मोफत वाचा
हे पुस्तक बिझनेस सारथीच्या ७ पुस्तकांच्या मालिकेतलं एक आहे. सणासुदीच्या ऑफरमध्ये सगळी पुस्तकं एकत्र घेतलीत, तर प्रत्येक पुस्तक खूपच स्वस्त पडतं.