भांडवल ते साम्राज्य · खंड १अनेकदा अडचण पैशाची नसते — किती पैसा लागतो, केव्हा लागतो आणि कुठून आणायचा, याचा हिशोब चुकलेला असतो. भांडवल उभारा हा हिशोब सोप्या मराठीत, तुमच्या स्वतःच्या आकड्यांवर करायला शिकवतं.

शेतकरी पेरणीआधी जमीन, बी, पाणी, खर्च आणि पावसाचा अंदाज पाहतो. व्यवसायात भांडवल घेण्याआधी तेच करायचं. पुस्तकाचा पहिला अध्याय तुम्हाला हे पाच प्रश्न देतो — आणि पुढचे अकरा अध्याय त्यांची उत्तरं शोधायला शिकवतात.
पैसा नेमका कोणती समस्या सोडवणार? आणि ती समस्या पैशानेच सुटेल का?
प्रत्येक रुपया कुठे जाणार — यंत्र, माल, पगार की राखीव?
स्वतःचे पैसे, ग्राहक, अडकलेला पैसा, कर्ज, योजना की गुंतवणूकदार?
व्याज, शुल्क, तारण, हमी, हिस्सा — आणि रात्रीची झोप.
विक्री निम्मी झाली किंवा पैसे दोन महिने उशिरा आले, तर काय?
हा गरज–उपयोग–स्रोत–किंमत–जोखीम आराखडा लेखकाने शिकवण्यासाठी तयार केलेला शैक्षणिक आराखडा आहे.
तुम्ही नवीन असा किंवा जुने — पुस्तकात दोघांसाठी वेगळा मार्ग आहे. सायली आणि महेश पहिल्या अध्यायापासून बाराव्या अध्यायापर्यंत तुमच्यासोबत चालतात, आणि त्यांचे आकडे प्रत्येक अध्यायात पुढे जातात.
कर्जाचा अर्ज बाजूला ठेवला, कुटुंबाच्या सुरक्षिततेचे पैसे वेगळे ठेवले, आणि आधी बाजार तपासला.
पगाराचे पैसे कमी पडत होते — नवं कर्ज न घेता, आपल्याच व्यवसायात अडकलेला पैसा मोकळा केला.
सायली आणि महेश ही काल्पनिक पात्रं आहेत; त्यांचे आकडे शैक्षणिक उदाहरणं आहेत.
प्रत्येक अध्याय आधीच्या अध्यायावर उभा आहे. आधी स्वस्त आणि कमी धोक्याचे मार्ग, मगच कर्ज आणि गुंतवणूकदार.
प्रत्येक अध्यायाच्या शेवटी स्वतःला तपासण्याचे प्रश्न, कृतीपत्रिका, निर्णयाची तपासणी-सूची आणि सात दिवसांची कृती-योजना आहे.
प्रत्येक इंग्रजी संज्ञा मराठीत समजावलेली, उदा. खेळतं भांडवल (Working Capital). सरकारी योजना आणि नियमांची माहिती ऑक्टोबर २०२६ मध्ये अधिकृत स्रोतांवरून तपासलेली.
स्पष्ट सांगतो: हे अभिप्राय ‘भांडवल उभारा’बद्दल नाहीत. ते लेखकाच्या ‘एक नंबर जिद्द जिंकण्याची’ या पुस्तकाबद्दल आणि बिझनेस सारथीच्या प्रशिक्षणाबद्दल आहेत. ‘भांडवल उभारा’ हे नवीन पुस्तक आहे — त्याचे वाचक-अभिप्राय अजून आलेले नाहीत.
‘एक नंबर जिद्द जिंकण्याची’ — प्रस्तावना: कृष्ण प्रकाश (IPS), तत्कालीन पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड · “आयर्नमॅन”
'एक नंबर जिद्द जिंकण्याची' मी वाचलंय सर. सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणाला भेदून त्यात नवचैतन्य, आत्मविश्वास जागृत करण्याचा हा प्रयत्न खरोखरच अद्वितीय, अकल्पनीय आहे.
मी जवळपास १५ वर्षे व्यवसायात आहे, पण माझ्या व्यवसायाचे vision, mission, purpose काय आहे, हे आतापर्यंत स्पष्ट झालेच नव्हते — यावेळी ते स्पष्ट झाले… नवीन काय करून व्यवसाय वाढवता येईल याचा विचार करून आम्ही काही AMC पॅकेज डिझाईन केले, आणि आम्हाला २ ठिकाणी AMC साठी निवडले गेले.
माझ्या लाईफच्या ५० वर्षांत जे मी गमावलं होतं, ते या १० दिवसांत कमावलं — तो म्हणजे माझा "आत्मविश्वास".
मला आयुष्यात नक्की काय करायचं आहे हेच कळत नव्हतं. पण या प्रश्नाचं उत्तर मला इथे मिळालं.
दररोज पुढील गोष्ट ऐकण्याची उत्कंठा वाढत जात आहे… हा ४० दिवसांचा ज्ञानरूपी, विश्वासाने भारलेला, प्रेरणेने ओतप्रोत भरलेला प्रवास कायमस्वरूपी लक्षात राहील.
उदाहरणार्थ, ₹२ लाखांच्या कर्जावर १८% व्याज म्हणजे महिन्याला सुमारे ₹३,०००. एक चुकीचं कर्ज टाळलं, तरी हे पुस्तक अनेक पटींनी वसूल होतं.


कूपन कोड टाकायची गरज नाही — सणासुदीची सवलत चेकआउटवर आपोआप लागू होते.
🪔 ऑफर १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत
वाचून बघा, कृतीपत्रिका भरून बघा. धोका आमचा. पैसे परतीचे नियम वाचा →
₹१४९ मध्ये १२ अध्याय, ४९ कृतीपत्रिका आणि तुमचा स्वतःचा ९० दिवसांचा भांडवल आराखडा. ७ दिवसांत पैसे परतीची हमी.
हे पुस्तक बिझनेस सारथीच्या ७ पुस्तकांच्या मालिकेतलं एक आहे. सणासुदीच्या ऑफरमध्ये सगळी पुस्तकं एकत्र घेतलीत, तर प्रत्येक पुस्तक खूपच स्वस्त पडतं.