🪔 सणासुदीची किंमत: ₹२४९ (नेहमी ₹३३३) · ऑफर १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत
१,२४१ दिवस? · एक कादंबरी, जी धंदा एका पानावर आणते

तुमचा संपूर्ण धंदा —एका पानावर.

"मी आठवडाभर गावाला गेलो, तर दुकान कोण चालवणार?" — हा प्रश्न तुम्हाला पडतो, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. महाराज आग्र्याहून परतले त्या काळातल्या एका ओस पेठेच्या गोष्टीतून, जगभर वापरला जाणारा Business Model Canvas — मराठीत "पट" — १९ प्रकरणांत शिका, आणि तुमच्या धंद्याचा पट स्वतः काढा.

₹३३३₹२४९VIJAYPARV25 चेकआउटवर आपोआप लागू · १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत
स्वराज्याचा पुनर्जन्म — योगेश अशोक उंडे यांचे पुस्तक
१९प्रकरणं
९घरांचा पट
९०दिवसांचा आराखडा
१५मिनिटं · एक प्रकरण
२२द्विपदी
ओळखीचं वाटतं?

दिवसभर राबता. तरी धंदा पुढे सरकत नाही.

हे कष्टाचे प्रश्न नाहीत. हे नकाशाचे प्रश्न आहेत. ज्याच्याकडे धंद्याचा नकाशा नाही, तो रोज जास्त कष्ट करतो — आणि तरी चुकीच्या दिशेने चालतो.

१,२४१
गोष्ट · १६६६ ते १६७०

स्वराज्य अर्धं गमावलेलं. आणि सह्याद्रीच्या कुशीत, एक ओस पेठ.

आग्र्याच्या कैदेतून महाराज निसटले, पण पुरंदरच्या तहात तेवीस किल्ले गेले होते. त्याच वेळी, घाटाखालच्या कळसपेठेत एक लंगडा तरुण नाकेदार म्हणून पोहोचतो — मल्हारी. त्याला सगळं स्वतःच करायचं आहे. आणि जेव्हा तो वीस दिवस दूर जातो, तेव्हा पेठ कोसळते.

"कार्तिकातली उन्हे सौम्य होती, पण घाटाची वाट सौम्य नव्हती."
— प्रकरण १, "जखमी पाय, ओस पेठ"

पुढच्या साडेतीन वर्षांत मल्हारी ती पेठ पुन्हा उभी करतो — चुका करत, ठेचा खात. आणि प्रत्येक ठेचेतून पटाचं एक घर उलगडतं. शेवटी माघ वद्य नवमीच्या रात्री, कोंढाण्याच्या कड्यावर कळसपेठेची दोरी चढते.

ही कादंबरी आहे: कळसपेठ आणि तिची पात्रे काल्पनिक आहेत. पार्श्वभूमीतल्या घटना जेधे शकावली आणि सभासद बखरीच्या आधारे; ऐतिहासिक व्यक्तींच्या तोंडी रचलेला एकही संवाद नाही.

"मीच करतो सगळे" — याचा वाटतो अभिमान फार,
पण मी नसताना कोसळते, ती पेठ नव्हे — तो भार.
प्रकरण १० ची द्विपदी · प्रत्येक प्रकरणाचा धडा दोन ओळींत
पट · Business Model Canvas

नऊ घरं. एक पान. संपूर्ण धंदा.

प्रत्येक घर आधी कळसपेठेच्या एका प्रसंगात भेटतं, मग आजच्या चार दुकानांत, आणि शेवटी तुमच्या भिंतीवरच्या पटावर. एखाद्या घरावर बोट ठेवा किंवा टॅप करा.

८मुख्य भागीदारKey Partnerships
कोणाच्या मदतीशिवाय माझं चालत नाही?सावकाराचा करार — आणि स्पर्धकाशी वाट वाटून घेणं.प्रकरण १३
७मुख्य कामेKey Activities
रोज न चुकता काय व्हायलाच हवं?पंतांचा गड-नियम: करणारा एक, पाहणारा दुसरा.प्रकरण १२
२मूल्य-वचनValue Propositions · पटाचा मधला दुवा
लोक माझ्याकडेच का यावेत?स्वस्ताई नव्हे — "खरं माप, सुरक्षित वाट."प्रकरण ३
४ग्राहक-नातेCustomer Relationships
एकदा आलेला ग्राहक परत का येईल?गोदाक्काची उधारीची वही आणि जाहीर भाव.प्रकरण ७
१ग्राहक-गटCustomer Segments
माझा माल नेमका कोणासाठी आहे?एका दारातल्या तीन रांगा — पहाटेचे शेतकरी, दुपारच्या बाया, घाटावरचे व्यापारी.प्रकरण १, २
६मुख्य संसाधनेKey Resources
धंदा कशाच्या जोरावर उभा आहे?गोदाक्काच्या डोक्यातली वही — ती कागदावर कशी आणायची.प्रकरण ११
३पोहोचवाटाChannels
ग्राहकापर्यंत माल कसा पोहोचतो?पावसाने बंद झालेली घाटवाट, दवंडी आणि तांडे.प्रकरण ४
९खर्चाची रचनाCost Structure
कोणता खर्च स्नायू, कोणता चरबी?"कोणाला कमी करायचं?" — कात्री लावण्याआधी बळ ओळखा.प्रकरण १४
५उत्पन्नाचे स्रोतRevenue Streams
पैसा कुठून येतो — एकच झरा आहे का?जकात, भाडे, साठवण, मापाई — एकच खांब की अनेक झरे.प्रकरण ८

💡 पुस्तकासोबत हा पट छापण्याजोग्या मराठी PDF मध्ये मोफत — भिंतीवर लावा आणि भरा.

मूळ रचना: The Business Model Canvas — अलेक्झांडर ऑस्टरवाल्डर व येव्ह पिन्यूर; Strategyzer AG (strategyzer.com), CC BY-SA 3.0.

पुस्तक संपेल तेव्हा

तुमच्या हातात असेल — फक्त माहिती नव्हे, तर तुमच्याच धंद्याचे कागद.

▦

तुमचा पट

नऊ घरं, तुमच्याच शब्दांत — धंदा एका नजरेत दिसणारा नकाशा.

✋

"फक्त मीच" यादी

कोणती कामं फक्त तुम्हीच करता, आणि त्यातली कोणती आठवड्याभरात सोपवता येतील.

⚖

करणारा-पाहणारा

प्रत्येक महत्त्वाच्या कामाला एक करणारा, एक तपासणारा — चुका तुमच्याशिवाय पकडल्या जातील.

〰

सरळ-वाकडी रेघ

तुमची कोणती खात्री पुराव्यावर आहे, आणि कोणती फक्त अंदाज — हे स्वस्तात तपासण्याची पद्धत.

⇄

स्पर्धक-भागीदार नकाशा

कोणाशी स्पर्धा, आणि कोणाशी खर्च किंवा ऑर्डर वाटून घ्यायची — अटींसह.

९०

९० दिवसांचा आराखडा

३० दिवस पाहणं, ३० दिवस तपासणं, ३० दिवस बदलणं — आणि दर महिन्याचा एक तास पुनरावलोकन.

१९ प्रकरणंमोफत छापण्याजोगा मराठी पट९० दिवसांचा आराखडा२२ द्विपदी५१ जुन्या शब्दांची सूचीप्रत्येक प्रकरण सुमारे १५ मिनिटं
आजची पेठ

प्रत्येक धडा — आजच्या चार दुकानांत.

पुस्तकातले हे चार उद्योजक (काल्पनिक पात्रं) प्रत्येक प्रकरणात तोच धडा आपल्या धंद्यात लावून पाहतात — म्हणजे तुम्हाला तो कसा लावायचा, ते दिसतं.

सुनीताऔषधांचं दुकान · एकाच वितरकावर अवलंबून
संदीपफॅब्रिकेशन युनिट · एकाच मोठ्या ग्राहकावर टांगलेला धंदा
अण्णाखानावळ · अण्णा नसले की चव बदलते
प्रियाकोचिंग क्लास · पालक पैसे देतात, विद्यार्थी शिकतात
आत काय आहे

तीन अंक. एकोणीस प्रकरणं. एक प्रवास.

अंक १ · पुनरागमन

  • १जखमी पाय, ओस पेठ
  • २तीन रांगा, एक दरवाजा
  • ३स्वस्त की खरे?
  • ४पावसाने बंद केलेली वाट
  • ५कौलाचे आश्वासन

अंक २ · पुनर्रचना

  • ६तहाचे वारे
  • ७उधारीची वही
  • ८कौलाची मुदत संपली
  • ९दूरचा कारभार
  • १०मल्हारीशिवाय पेठ
  • ११गोदाक्काच्या डोक्यातली वही
  • १२पंतांचा गड-नियम
  • १३तोच सावकार, पुन्हा
  • १४कोणाला कमी करायचे?
  • १५तिसरी तारीख

अंक ३ · पुनर्बांधणी

  • १६पट जुळवताना
  • १७न सांगितलेली मागणी
  • १८माघ वद्य नवमी
  • १९शोक आणि पाळणा
  • ९०उपसंहार — तुमचे पहिले ९० दिवस
पहिलं प्रकरण — "जखमी पाय, ओस पेठ" — मोफत वाचा.
आवडलं, तरच पुस्तक घ्या.
मोफत प्रकरण उघडा →
हे पुस्तक कोणासाठी

प्रामाणिकपणे — कोणासाठी आहे, आणि कोणासाठी नाही.

तुमच्यासाठी आहे, जर…

  • तुमचं दुकान, छोटा कारखाना, खानावळ, क्लास किंवा सेवा-व्यवसाय आहे
  • धंदा तुमच्याशिवाय एक आठवडाही चालत नाही
  • नवा धंदा सुरू करताय, आणि आधी पूर्ण चित्र पाहायचंय
  • इंग्रजी पुस्तकं वाचायला जड जातात, पण शिकायची इच्छा आहे
  • गोष्ट वाचायला आवडते, आणि इतिहासाची गोडी आहे

तुमच्यासाठी नाही, जर…

  • तुम्ही झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग शोधताय
  • तुम्हाला इतिहासाचा संशोधन-ग्रंथ हवाय — ही कादंबरी आहे
  • तुम्ही फक्त वाचणार आहात, कृती करणार नाही
स्वराज्याचा पुनर्जन्म पुस्तक

तुमचा संपूर्ण धंदा, एका पानावर — ₹२४९ मध्ये.

  • १९ प्रकरणांची कादंबरी — मोबाईलवर, वाचक पोर्टलवर
  • मोफत छापण्याजोगा मराठी पट
  • ९० दिवसांचा आराखडा आणि कृतीपत्रकं
  • २२ द्विपदी आणि ५१ जुन्या शब्दांची सूची
₹३३३₹२४९
VIJAYPARV25 चेकआउटवर आपोआप लागू · ऑफर १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत
होय, मला माझा धंदा एका पानावर हवा — ₹२४९ →
वाचक आणि प्रशिक्षणार्थी

योगेश उंडे यांच्या पुस्तकांबद्दल आणि प्रशिक्षणाबद्दल — त्यांच्याच शब्दांत

प्रामाणिकपणे: "स्वराज्याचा पुनर्जन्म" हे नवं पुस्तक आहे — त्याच्या वाचकांचे अभिप्राय अजून येत आहेत. खाली दिलेले अभिप्राय लेखकाच्या इतर पुस्तकाबद्दल आणि प्रशिक्षणाबद्दल आहेत; प्रत्येकाखाली तो कशाबद्दल आहे, ते लिहिलं आहे.

📖 पुस्तक वाचकांचे अभिप्राय

'एक नंबर जिद्द जिंकण्याची' मी वाचलंय सर. सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणाला भेदून त्यात नवचैतन्य, आत्मविश्वास जागृत करण्याचा हा प्रयत्न खरोखरच अद्वितीय, अकल्पनीय आहे.

— अरुण सोनवणेवाचक · एक नंबर जिद्द जिंकण्याची

I am not that book reading person, but your book is not making me bore while reading… मी रोज रात्री मुलासोबत वाचते, त्याला पण खूप आवडलं आहे.

— हर्षदा कुलकर्णीवाचक · एक नंबर जिद्द जिंकण्याची
🎓 बिझनेस सारथी प्रशिक्षणार्थींचे अनुभव

मी जवळपास १५ वर्षे व्यवसायात आहे, पण माझ्या व्यवसायाचे vision, mission, purpose काय आहे, हे आतापर्यंत स्पष्ट झालेच नव्हते — यावेळी ते स्पष्ट झाले… नवीन काय करून व्यवसाय वाढवता येईल याचा विचार करून आम्ही काही AMC पॅकेज डिझाईन केले, आणि आम्हाला २ ठिकाणी AMC साठी निवडले गेले.

— ज्ञानेश्वर धेरंगेव्यावसायिक · प्रशिक्षणार्थी

माझ्या लाईफच्या ५० वर्षांत जे मी गमावलं होतं, ते या १० दिवसांत कमावलं — तो म्हणजे माझा "आत्मविश्वास".

— शैलजाप्रशिक्षणार्थी · लाईफ स्किल प्रशिक्षण
योगेश अशोक उंडे
लेखक

योगेश अशोक उंडे

  • संस्थापक व मुख्य मार्गदर्शक, Business Saarathi
  • संस्थापक व अध्यक्ष, लक्ष्य गुरुकुल
  • MBA, NMIMS
  • एक नंबर जिद्द जिंकण्याची, बिझनेस सम्राट, रण-नीती आणि भांडवल ते साम्राज्य (खंड १, २, ३) — या पुस्तकांचे लेखक

"मी मार्ग शोधून काढतोच, लोकांचं माझ्याबद्दलचं हे ठाम मत आहे; आणि त्या मताला जागणं अन् तसं जगणं, हेच माझ्या आयुष्याचं निष्काम व्रत आहे."

मनातले प्रश्न

घेण्याआधी विचारले जाणारे प्रश्न

हे इतिहासाचं पुस्तक आहे की धंद्याचं?

दोन्ही. गोष्ट १६६६–७० च्या पार्श्वभूमीवर आहे, पण प्रत्येक प्रकरणानंतर "स्वराज्यातून व्यवसायाकडे", आजच्या चार दुकानांचं उदाहरण, आणि तुमच्या धंद्यासाठी एक कृती आहे. गोष्ट वाचायला आवडेल, आणि धडा धंद्यात उतरेल.

मला इंग्रजी येत नाही. Business Model Canvas समजेल का?

हो. संपूर्ण पुस्तक सोप्या मराठीत आहे. Canvas ला इथे "पट" म्हटलंय, आणि नऊ घरांना मराठी नावं आहेत — इंग्रजी शब्द फक्त कंसात. शेवटी ५१ जुन्या शब्दांची सूचीही आहे.

मला वेळ नाही.

एक प्रकरण सुमारे १५ मिनिटांचं आहे. रोज एक प्रकरण वाचलं, तर १९ दिवसांत पुस्तक पूर्ण — आणि त्यासोबत तुमचा पट तयार.

माझा धंदा खूप छोटा आहे. याचा उपयोग होईल का?

पटाची नऊ घरं प्रत्येक धंद्याला असतात — पानाच्या टपरीलाही आणि कारखान्यालाही. पुस्तकातली उदाहरणंही औषध दुकान, खानावळ, क्लास आणि फॅब्रिकेशन युनिट अशा छोट्या धंद्यांचीच आहेत.

मोबाईलवर वाचता येईल का? PDF मिळेल का?

पुस्तक बिझनेस सारथी वाचक पोर्टलवर आहे — मोबाईल, टॅबलेट किंवा संगणकावर वाचा; वेगळं ॲप लागत नाही. पुस्तकाची PDF मिळत नाही; मात्र पट छापण्याजोग्या स्वरूपात मोफत मिळतो.

आवडलं नाही तर?

फायद्याचं वाटलं नाही? ७ दिवसांत कधीही ऑर्डर रद्द करा — वायद्यानं १००% पैसे परत!

पैसे कसे भरायचे? कूपन टाकावं लागेल का?

UPI (Google Pay, PhonePe, Paytm), डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंग — Razorpay द्वारे सुरक्षित. सणासुदीचा कोड VIJAYPARV25 चेकआउटवर आपोआप लागू होतो; वेगळं काही करायची गरज नाही.

अजून काही विचारायचंय?

WhatsApp करा: +९१ ९९६०० ६८०६७

सिंहगड ते सिंहासन — आगामी पुस्तक
लवकरच · पुढचा भाग

सिंहगड ते सिंहासन

सिंहगडापासून सुरतेपर्यंत... आणि सुरतेपासून रायगडापर्यंत! १,५८३ दिवस? या पुस्तकात तुम्ही धंद्याचा नकाशा काढाल; पुढच्या पुस्तकात त्या नकाशावर उभे करू सिंहासनाचे स्तंभ — व्यवसाय विस्ताराचे ९ स्तंभ (9 Building Blocks of Business Scaling Plan).

आज रात्री पहिलं प्रकरण. ९० दिवसांनी — तुमचा धंदा एका पानावर.

मल्हारीला पेठ उभी करायला साडेतीन वर्षं लागली. तुम्हाला त्याच्या चुका टाळून, १९ प्रकरणांत तो रस्ता दिसेल.

₹२४९ मध्ये "स्वराज्याचा पुनर्जन्म" घ्या →
अजून खात्री नाही? आधी पहिलं प्रकरण मोफत वाचा ↗
🪔 सक्षम मराठी भव्य व्यवसाय समृद्धी महोत्सव

एकच पुस्तक की संपूर्ण ई-ग्रंथालय?

हे पुस्तक बिझनेस सारथीच्या ७ पुस्तकांच्या मालिकेतलं एक आहे. सणासुदीच्या ऑफरमध्ये सगळी पुस्तकं एकत्र घेतलीत, तर प्रत्येक पुस्तक खूपच स्वस्त पडतं.

बिझनेस सारथीची सर्व पुस्तकं
सर्व ७ पुस्तकं₹१,६६५₹९९९कोड VIJAY40
७ पुस्तकं + छापील "एक नंबर जिद्द"₹२,०८२₹१,२४९कोड VIJAY40
भांडवल ते साम्राज्य — तिन्ही खंड₹५९८₹२९९कोड VIJAYDURG50
📚 सर्व पुस्तकं आणि संपूर्ण ऑफर पाहा → 🛡️ फायद्याचं वाटलं नाही? ७ दिवसांत कधीही ऑर्डर रद्द करा — वायद्यानं १००% पैसे परत! · ऑफर १० नोव्हेंबरपर्यंत
प्रश्न आहे? WhatsApp करा
स्वराज्याचा पुनर्जन्म · ₹२४९१० नोव्हेंबर २०२६ पर्यंत
पुस्तक घ्या →
Business Saarathi™ is a brand of Lakshya Gurukul · बिझनेस सारथी™ हा लक्ष्य गुरुकुलचा ब्रँड आहे.
Lakshya Gurukul (proprietor: Yogesh Ashok Unde) · Kohinoor Majestic, Office No. 128, Behind Kundan Hyundai, Near Thermax Chowk, Chinchwad, Pune 411019, Maharashtra, India
contact@businesssaarathi.com · WhatsApp +91 99600 68067
Books·Terms & Conditions·Privacy Policy·Refund Policy·Shipping Policy·Contact Us
Our books are educational. We do not guarantee any business outcome, income or financial return. This website is not part of Facebook™ or Meta Platforms, Inc., and is not endorsed by Meta.